Friday, April 11, 2008

मैत्री

एकही मित्र नाही असा
माणुस जगात नसेल
क्षणापुरती का होईना
प्रत्येकाने मैत्री केली असेल // १ //

मैत्रीला कधी गंध नसतो
मैत्रीचा फ़क्त छंद असतो
मैत्री सर्वांनी करावी
त्यात खरा आनंद असतो // २ //

मैत्रीचं नातं कसं
निस्वार्थी अन निरागस असतं
भावा-भावांसारखं त्यात
भांडण कधीच नसतं // ३ //

भावालाही सांगत नाही त्या गोश्टी
आपण मित्राला सांगतो
मनातल्या गोश्टी सांगुन
त्याच्याशी जवळकीने वागतो // ४ //

शरिरात रक्त नसेल तरी चालेल
पण जीवनात मैत्री
ही हवीच कितीही जुनी झाली तरी
ती नेहमी वाटते नवीच // ५ //

रक्ताच्या नात्यात नसेल एवडी
मैत्रीच्या नात्यात ओड असते
कशीही असली तरी शेवटी
मैत्री गोड असते // ६ //

मैत्री म्हणजे त्याग आहे
मैत्री म्हणजे विश्वास आहे
Ocxigon हा नावापुरता
तर मैत्री ख्ररा श्वास आहे // ७ //

मैत्रीच्या या नात्याबद्दल
लिहीण्यासारखं खुप आहे
ख-या नात्याला नसलं तरी
मैत्रीला एक रुप आहे // ८ //

मैत्रीची ही कथा आता
सांगायची मी थांबवतो
नाही तर तुम्हीच म्हणाल
मैत्रीचं पाल्हाळ संदेश खुपचं लांबवतो // ९ //

संदेश म्हात्रे





2 comments:

Unknown said...

hi sandesh
khup chan kavita kartos re...

MAITRICHA khara arth sangitla aahes........
ok by by

NIKITA
KEEP IT UP......

Unknown said...

kanchan