Monday, July 14, 2008

असं होतं माझं प्रेम

माझं प्रेम
एखादया हिमनगाचं रूप होतं
वर वर थोडसचं दिसलं तरी
ते आत मध्ये खुप होतं // १ //

माझं प्रेम
एक बोन्साय केलेलं झाड होतं
समोर येऊनही तुला दिसलं नाही
कारण ते ह्रुदयाच्या आड होतं // २ //

माझं प्रेम
इंद्रधनुश्यासारखं रंगीत होतं
रंगाप्रमाणेच त्यामध्ये
सुमधुर असं संगीत होतं // ३ //

माझं प्रेम
मुकं असुनही बोलणारं होतं
तुझ्यावर सुखाची उधळण करुन
स्वत: दु:खं झेलणारं होतं // ४ //

माझं प्रेम
चिंध्या जमवुन केलेल्या गोधडी सारखं होतं
तुझ्या जमविलेल्या सर्व आटवणींनी
भरलेल्या पोतडी सारखं होतं // ५ //

माझं प्रेम
निर्मळ आणि निश्पाप होतं
इतरांसमोर तुझं नाव काढणही
माझ्यासाटी पाप होतं // ६ //

माझं प्रेम
सागराचा गाजही होतं
कालच्या एवढचं ते आजही होतं // ७ //

असं होतं माझं प्रेम
इतरांपेक्षा अगदी भिन्न
जसं वजाबाकीच्या गणितात
बेरजेचं चिन्ह // ८ //

संदेश क्रुष्णा म्हात्रे