Thursday, April 10, 2008

" एक प्रेमळ स्वप्न "


लहानपणापासुन वाटायचं
आपणही प्रेम करावं
स्वत:साटी सर्वच मरतात
कुणा एकीसाटी आपणही मरावं // १ //

अनपेक्षीत घट्नेसारखी
ती माझ्या जीवनात आली
बघता बघता मला वाटलं
ती माझीच झाली // २ //

माझ्या आयुश्यात तिच्या अचानक येण्याने
मला खरच काही सुचत नव्हतं
वरण भातासारखं साधं जेवणही
अजिबात मला पचत नव्हतं // ३ //

प्रत्यक्ष कधीच विचारलं नाही
पण अप्रत्यक्षरित्या कैकदा सांगितलं होतं
तिच्याकडे नसलं तरी
देवाकडे तिला अनेकदा मागितलं होतं // ४ //

काय घडतयं सारं
माझं मलाचं कळत नव्हतं
पण मन माझं मात्र
फ़क्त तिच्याच मागे पळत होतं // ५ //

येता जाता मी तिची
स्वप्नं पाहु लागलो
सर्वांमध्ये मिसळणारा मी
एकटा एकटा राहु लागलो // ६ //

म्हटलं पळणं आणि स्वप्न थांबवुन
आपण तिला विचारायला हवं
तिच्याकडून होकार असो वा नकार
सत्याला सामोरं जायला हवं // ७ //

ज्यादिवशी विचारणार होतो
त्यादिवशी ती आलीच नव्हती
म्हटलं बरं झालं......
नाहीतरी माझी पण तयारी झालीच नव्हती // ८ //

दुस-या दिवशी
तिनेच येऊन म्हटलं "आय लव्ह यु"
इतक्यात आईने हात लावुन विचारलं,
एवडा वेळ झोपला आहेस आज कामावर जाणार नाहीस का तू ? // ९ //

म्हणजे एवडा वेळ मी
स्वप्नांच्या दुनियेत जगत होतो
आयुश्यातील स्वप्नांना
स्वप्नांमध्ये बघत होतो // १० //

असं हे प्रेमळ स्वप्न
नेहमी हवहवसं वाटतं
स्वप्न बघताना काही वाटत नाही
पण मोड्लं की मन मात्र दाटतं // ११ //

संदेश म्हात्रे



2 comments:

Unknown said...

sandesh, tu lihileleli kavita vachun maze man junya atvanit ramun gele . mitra tu je kahi lihile ahes te mazya ayushat houn gelay tyamule mala te khup avadlay

Unknown said...

sagar patil ( Dombivali )- kharch prem kartana kahi vatat nahi pan te tutun gelyavar kahi suchat nahi