Tuesday, April 8, 2008

"संदेशच्या चारोळ्या"


1 मी तुला पाहतो
आणि पाहतच बसतो
तुला पाहील्यावर जगाचं जाऊ दे गं
पण.... मी स्वत:ला सुध्दा विसरतो
================================
२ मन हे नेहमी
फ़ुलपाखरासारखं असायला हवं
एकीने नाही म्हट्लं तर काय झालं ?
लगेच दुसरीवर बसायला हवं
================================
३ तुझी आणि चंद्राची तुलना
मी कधीच करणार नाही
कारण..... चंद्रावर कीतीतरी डाग आहेत
पण तुझ्यात एकही नाही
================================
४ मी तुझ्याबरोबर खेळतो
तेच मुळी हरण्यासाटी
तुझ्या गालावरल्या खळीत
हसू भरण्यासाटी
================================
५ तु माझी नाहीस म्हणून दुस-याची होऊ नये
असे मला वाट्णार नाही
ACID फ़ेकून तुझं जीवन उध्वस्त करणं
हे कधीच मला पट्णार नाही
================================
६ College जीवनात माझं
नकळत एकीवर प्रेम जडलं
पण..... मी तिला विचारलचं
नाही हेचं मला नडलं
================================
७ प्रेमभंग म्हणजे
मुका मार आहे
जखमा दिसत नसल्या तरी
त्याच्या वेदना फ़ार आहेत
================================
८ मला पाहुन तु हसली नाहीस
असं कधी झालचं नाही
आपल्या मनात असुनसुध्दा
एकत्र होता कधी आलचं नाही
================================
९ शाळेत मुली बाजुला बसणं
ही आमच्या वेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावं
ही माझी छोटीसी अपेक्षा होती
================================
१० तु सुखात आहेस हे ऎकून
फ़ार बरं वाटलं
यावरून देवसुध्दा माणसाचं ऎकतो
हे मला पटलं
================================
संदेश म्हात्रे

No comments: