Wednesday, May 7, 2008

सारं काही राहुन गेलं

मलाही खेळायचं होतं
शालेय जीवनात अभ्यासाच्या नादात
माझं खेळायचचं राहून गेलं // १ //

मलाही करीअर करायचं होतं
पण Collegej जीवनात मुलींच्या नादात
माझं करीअर करायचचं राहून गेलं // २ //

मलाही बिझनेस करायचा होता
पण ऐन उमेदीच्या काळात नोकरीच्या नादात
माझं बिझनेस करायचचं राहून गेलं // ३ //


मलाही स्वच्छंदी जगायचं होतं
पण वैवाहीक जीवनात आई-बायकोचं भांडण मिटवण्याच्या नादात
माझं स्वच्छंदी जगायचचं राहून गेलं // ४ //

आता तर मला मरायचं होतं
पण कौटुंबीक जीवनात संसाराच्या नादात
माझं मरायचचं राहून गेलं // ५ //

या जीवनरूपी सागरामध्ये
आयुश्य माझं वाहुन गेलं
खुप काही करायचं होतं
पण...... सारं काही राहुन गेलं


संदेश म्हात्रे

Tuesday, May 6, 2008

हे जीवनचं व्यर्थ आहे

तारुण्य़ाच्या उंबरटयावर
ना नोकरी आहे ना प्रेयसी
म्हणुनच मी म्हणतो ......... हे जीवनचं व्यर्थ आहे // १ //

विशीच्या या वयामध्ये
एका हातात सिगारेट तर एका हातात ग्लास आहे
म्हणुनच मी म्हणतो ......... हे जीवनचं व्यर्थ आहे // २ //

नाती गोती ही नावापुरती
इथं पैशालाच फ़क्त अर्थ आहे
म्हणुनच मी म्हणतो ......... हे जीवनचं व्यर्थ आहे // ३ //

परमार्थाच्या नावाखाली
इथं डोंगी बाबांचा चरीतार्थ आहे
म्हणुनच मी म्हणतो ......... हे जीवनचं व्यर्थ आहे // ४ //

इथं होणारी दंगलही
रामाच्या किंवा अल्लाच्या स्मरणार्थ आहे
म्हणुनच मी म्हणतो ......... हे जीवनचं व्यर्थ आहे // ५ //

इथं मदत करण्यामागे प्रत्येकाचा
काही ना काही स्वार्थ आहे
म्हणुनच मी म्हणतो ......... हे जीवनचं व्यर्थ आहे // ६ //

इथं गरीबांचं मरण
तर जगण्यासाटी पैसेवालाच समर्थ आहे
म्हणुनच मी म्हणतो ......... हे जीवनचं व्यर्थ आहे // ७ //

इथं लाचखोराला बड्ती
तर प्रामाणिक माणुस बडतर्फ़ आहे
म्हणुनच मी म्हणतो ......... हे जीवनचं व्यर्थ आहे // ८ //

किसनाच्या या नगरीमध्ये
गजाआड इथं पार्थ आहे
म्हणुनच मी म्हणतो ......... हे जीवनचं व्यर्थ आहे // ९ //

या मोहजालात फ़सण्यापेक्षा
आता मरणचं फ़क्त सार्थ आहे
मला समजलेला जीवनाचा
हाच खरा अर्थ आहे
म्हणुनच मी म्हणतो ......... हे जीवनचं व्यर्थ आहे // १० //
म्हणुनच मी म्हणतो ......... हे जीवनचं व्यर्थ आहे

संदेश म्हात्रे

Friday, May 2, 2008

माझं एक वेडं स्वप्न आहे

माझं एक वेडं स्वप्न आहे
जगात कुणीही उपाशी राहू नये
बी एम सी च्या फ़ुट्लेल्या जलवाहीनीचं पाणी
उगाचं फ़ुकट कधी वाहू नये // १ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
जाती मुळे माणसा - माणसात फ़ुट कधी पडू नये
धर्माच्या नावाखाली रक्तपात होऊन
दंगल कधी घडू नये // २ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
हिंदु मुस्लिम शीख ईसाई यांची मने जुळावी
भारताची ही एकात्मता
सा-या विश्वाला कळावी // ३ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
व्रुध्दाश्रम बांधण्याची गरज कधी लागु नये
व्रुध्दांना व्रुध्दाश्रमात पाटविण्यासारखं
तरुणांनी कधी वागु नये // ४ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
सासु - सूनांचं भांड्ण कायमचं मिटु दे
त्यांच्या मनातील किल्मीश
सामोपचाराने सुटू दे // ५ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
भ्रश्टाचार इथुन मुळापासुन निघु दे
भ्रश्टाचारमुक्त देश म्हणुन
सर्वांनी भारताकडे बघु दे // ६ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
दहशतवादाचं सावट जगावरुन जाऊ दे
सुख-शांतीचे दिवस
पुन्हा पहिल्यासारखे येऊ दे // ७ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
क्रिकेटचा भारतीय संघ विश्व्चशक पुन्हा भारतात आणेल
" इंडीयन क्रिकेटर्स आर ग्रेट "
असं सारं विश्व तेव्हा म्हणेल // ८ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
भारतमातेच्या रक्षणासाटी सर्वजण त्याग करतील
भारताच्या एकात्मतेसाटी
प्रत्येकजण तिरंगा हाती धरतील // ९ //

माझ्या या वेडया स्वप्नांना
यश कधी येईल का ?
या सा-या स्वप्नांमधुन
एखादं स्वप्न तरी साकार होईल का ? // १० //

संदेश म्हात्रे