Tuesday, April 8, 2008

"संदेशच्या चारोळ्या"


1 मी तुला पाहतो
आणि पाहतच बसतो
तुला पाहील्यावर जगाचं जाऊ दे गं
पण.... मी स्वत:ला सुध्दा विसरतो
================================
२ मन हे नेहमी
फ़ुलपाखरासारखं असायला हवं
एकीने नाही म्हट्लं तर काय झालं ?
लगेच दुसरीवर बसायला हवं
================================
३ तुझी आणि चंद्राची तुलना
मी कधीच करणार नाही
कारण..... चंद्रावर कीतीतरी डाग आहेत
पण तुझ्यात एकही नाही
================================
४ मी तुझ्याबरोबर खेळतो
तेच मुळी हरण्यासाटी
तुझ्या गालावरल्या खळीत
हसू भरण्यासाटी
================================
५ तु माझी नाहीस म्हणून दुस-याची होऊ नये
असे मला वाट्णार नाही
ACID फ़ेकून तुझं जीवन उध्वस्त करणं
हे कधीच मला पट्णार नाही
================================
६ College जीवनात माझं
नकळत एकीवर प्रेम जडलं
पण..... मी तिला विचारलचं
नाही हेचं मला नडलं
================================
७ प्रेमभंग म्हणजे
मुका मार आहे
जखमा दिसत नसल्या तरी
त्याच्या वेदना फ़ार आहेत
================================
८ मला पाहुन तु हसली नाहीस
असं कधी झालचं नाही
आपल्या मनात असुनसुध्दा
एकत्र होता कधी आलचं नाही
================================
९ शाळेत मुली बाजुला बसणं
ही आमच्या वेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावं
ही माझी छोटीसी अपेक्षा होती
================================
१० तु सुखात आहेस हे ऎकून
फ़ार बरं वाटलं
यावरून देवसुध्दा माणसाचं ऎकतो
हे मला पटलं
================================
संदेश म्हात्रे

Monday, April 7, 2008

" न्यु ईयर न्यु बोय-फ़्रेंड जुन्याला विसरायचा नवा ट्रेंड "

जानेवारीत तिला पाहीलं आणि प्रेम करावसं वाटलं
फ़ेब्रुवारीत ती दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं

मार्चमध्ये ती माझ्याकडे पाहुन गोड ह्सली
एप्रिलमध्ये म्हटलं पोरगी हसली तर फ़सली

मे मध्ये मी तिच्याकडे ओड्लो गेलो

जुनमध्ये फ़क्त तिच्याच विचारांनी वेड्लो गेलो

जुलैमध्ये आम्ही पावसात भिजायचं टरवलं

औगस्टमध्ये तिला बिधास्तपणे फ़िरवलं

सप्टेंबरमध्ये मी तिच्या घरी गेलो

औक्टोबर मध्ये दोघं माथेरानला जाऊन आलो

नोव्हेंबरमध्ये मला स्ट्राईक झालं

एवडया ह्या प्रवासात तिला विचारायचचं राहुन गेलं

३१ डिसेंबला तिला पार्टिला नेलं

धाडस करुन तिला प्रपोज केलं

त्यावर ती म्हणते कशी ............

बारा महीने एकत्र फ़िरलो

हे काय कमी झालं ?

अरे वेडया ! आता नवा बोयफ़्रेंड
नवीन वर्श नाही का आलं

संदेश म्हात्रे

















जोडी तुझी माझी


भांड्ल्याशिवाय जेवण जात नाही ज्यांना ...........................
त्या दोघी म्हणजे सासु आणि सूना

इच्छा नसतानाही एकमेकांसमोर चेहरे टेवतात ह्सरे ........
ते दोघं म्हणजे जावई आणि सासरे

एकमेकींच्या पराभवातच मानतात आपला जय ...............
त्या दोघी म्हणजे नणंद आणि भावजय

एकाच घरात राहुनही ग्यास मात्र वेगळा हवा ..................
त्या दोघी म्हणजे जावा - जावा

बोलणं असतं कमी पण भांडायला असतात अधीर ..........
ते दोघं म्हणजे वहीनी आणि दिर

या सा-या नात्यांमुळे ज्या समस्या निर्माण होतात
त्या समस्या जे सामंजस्याने हाताळतात .........................
ते दोघं म्हणजे यशस्वी पती - पत्नी

संदेश म्हात्रे

Tuesday, January 22, 2008

" मला पहायचयं "


मी पाहीलयं पक्षांना, उंच उंच उडताना
वा-याबरोबर मस्तपैकी गप्पागोष्टी करताना // १ //

मी पाहीलयं फ़ुलपाखरांना, बागेमध्ये भिरभिरताना
बागेतल्या फ़ुलांना रंग आपले देताना // २ //

मी पाहीलयं शब्दांना एकमेकात गुंफ़ताना
एकमेकात गुंफ़ुन सुंदर काव्य होताना // ३ //

मी पाहीलयं झाडांना आकाशाकडे जाताना
आकाशाकडे जातानाच धरतीशी नातं जपताना // ४ //

मी पाहीलयं आभाळाला धरतीशी प्रेम करताना
प्रेमाचं प्रतिक म्हणून क्षितिज होऊन टेकताना // ५ //

आणि.....मी पाहीलयं माणसांना, माणसांशी वैर करताना
जाती-धर्माच्या नावाखाली जीवेही मारताना // ६ //

आता..... मला पहायचयं माणसांना, या सर्वांसारखं वागताना
कारण..... प्रेम असतं मह्त्वाचं सुखी आयुष्य जगताना


संदेश क्रुष्णा म्हात्रे