Friday, May 2, 2008

माझं एक वेडं स्वप्न आहे

माझं एक वेडं स्वप्न आहे
जगात कुणीही उपाशी राहू नये
बी एम सी च्या फ़ुट्लेल्या जलवाहीनीचं पाणी
उगाचं फ़ुकट कधी वाहू नये // १ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
जाती मुळे माणसा - माणसात फ़ुट कधी पडू नये
धर्माच्या नावाखाली रक्तपात होऊन
दंगल कधी घडू नये // २ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
हिंदु मुस्लिम शीख ईसाई यांची मने जुळावी
भारताची ही एकात्मता
सा-या विश्वाला कळावी // ३ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
व्रुध्दाश्रम बांधण्याची गरज कधी लागु नये
व्रुध्दांना व्रुध्दाश्रमात पाटविण्यासारखं
तरुणांनी कधी वागु नये // ४ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
सासु - सूनांचं भांड्ण कायमचं मिटु दे
त्यांच्या मनातील किल्मीश
सामोपचाराने सुटू दे // ५ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
भ्रश्टाचार इथुन मुळापासुन निघु दे
भ्रश्टाचारमुक्त देश म्हणुन
सर्वांनी भारताकडे बघु दे // ६ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
दहशतवादाचं सावट जगावरुन जाऊ दे
सुख-शांतीचे दिवस
पुन्हा पहिल्यासारखे येऊ दे // ७ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
क्रिकेटचा भारतीय संघ विश्व्चशक पुन्हा भारतात आणेल
" इंडीयन क्रिकेटर्स आर ग्रेट "
असं सारं विश्व तेव्हा म्हणेल // ८ //

माझं एक वेडं स्वप्न आहे
भारतमातेच्या रक्षणासाटी सर्वजण त्याग करतील
भारताच्या एकात्मतेसाटी
प्रत्येकजण तिरंगा हाती धरतील // ९ //

माझ्या या वेडया स्वप्नांना
यश कधी येईल का ?
या सा-या स्वप्नांमधुन
एखादं स्वप्न तरी साकार होईल का ? // १० //

संदेश म्हात्रे

No comments: